प्रस्तावना
नागपूर कृषि उत्पन्न बाजार समितीने विभाजन झाल्यानंतर बाजार समिती हिंगणा हि शासनाच्या आदेशान्वये दि. 06/05/2006 रोजी महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (नियमन) अधिनियम 1963 नुसार नव्याने स्थापन झालेली असून विसव्या वर्षात पर्दापण केलेले आहे. शेतकऱ्यांकरिता सर्व सोयींयुक्त एक कार्यक्षम बाजार समिती म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात समितीला यश आलेले आहे.
समितीचे कार्यक्षेत्र हिंगणा तालुक्या पूरते मर्यादित असून त्यात 156६ गावाचा समावेश आहे. समितीला विभाजनानंतर हिंगणा बाजार समितीला हिंगणा (वानाडोंगरी) येथील 1.62 हेक्टर व सावंगी (आसोला) येथील 1.53 हेक्टर जागा उपलब्ध झालेली आहे. सध्या हिंगणा मार्केट यार्डवर थोक फळे व भाजीपाला व किरोकळ फळे व भाजीपाला बाजार, गुरेबाजार व धान्य बाजार भरतो तसेच उपबाजार सावंगी (आसोला) येथे गुरे बाजार भरतो.
समितीने नियमाखाली कापूस, सोयाबिन, तुअर, उडीद, मुंग, ज्वारी, गहु, सुर्यफुल, चना, जवस, भुईमुंग, तांदुळ, मिरची, चिकु, मुळा, पेरू, संत्रा, आंबा, लिंबु, केळी, अनार, टरबुज, कोबी, वांगे, आलू, कांदे, चवळी, मेथी, गांजर, धान व गुरे अधिसुचित केलेली आहे.